…त्यामुळे पैलवानांची संख्या कमी पडतेय – माजी आमदार दिलीप मोहिते

चिंबळी – गावा गावात अजूनही पारंपरिक पद्धतीने यात्रा भरविली जाते आणि कुस्ती स्पर्धेत आयोजन केले जाते, त्यासाठी भरपूर बक्षीस देण्यात येते म्हणून पैलवान घडविण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात; परंतु पैलवानांना कुस्ती स्पर्धेसाठी येण्याजाण्यासाठी खर्च ही होतो, त्यामुळे पैलवानांची संख्या कमी पडत आहे, असे प्रतिपादन माजी आमदार दिलीप मोहिते यांनी मरकळ येथे केले.
मरकळ (ता. खेड) येथे जय हनुमान भैरवनाथ महाजनांच्या उत्साहा निमित्त गुरवार (दि. 2) ते शनिवार (दि. 4) विविध धार्मिक कार्यक्रमासह बैलगाडा शर्यती भरविण्यात आल्या होत्या. यावेळी माजी आमदार मोहिते पाटील यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली त्यावेळी ते बोलत होते असे माजी सरपंच राजाराम लोखंडे यांनी सांगितले. गुरुवारी सकाळी आठ ते नऊ श्रीची महापुजा व पालखी (छबीना) हारतुरे मांडव डहाळे मिरवणूक, अभिषेक, बैलगाडा शर्यती, कुस्ती स्पर्धा करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा, आर्केस्ट्रा आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
उत्साहा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये दोन दिवस 250 बैलगाडे सहभागी झाले होते तर कुस्ती स्पर्धेत सुमारे मल्ल सहभागी होऊन कुस्ती शौकीनांची मने बहारून टाकली. या कस्ती स्पर्धेत श्री हनुमान भैरवनाथ महाराज उत्सव कमिटी, ग्रामस्थ, माजी अध्यक्ष किरण पाचपुते यांच्या वतीने एक चांदीची गदा यांच्या वतीने दादा शेळके व शुभम शिदनाळे यांच्यात 3 लाख 33 हजार रुपयांची कुस्ती माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीमध्ये शुभम शिदनाळे यांने चांदीची गदा पटकावली. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ व जय हनुमान भैरवनाथ उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले होते.





