श्रीरामाचे विचार आचरणात आणण्याची गरज

अजित कोतकर; मनोज कोतकर मित्रमंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन
नगर (प्रतिनिधी) – प्रभु श्रीरामाचे विचार युवा पिढीला व सर्वच समाजाला प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार प्रत्यक्षात आचरणात आणण्याची गरज आहे. खास करुन युवकांनी संकटाच्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोनातून समाजामध्ये काम केले पाहिजे, असे विचार अजित कोतकर यांनी व्यक्त केले.
करोना विषाणुमुळे सध्याच्या काळात सर्वच रक्तपेढ्यांत रक्तांचा तुडवडा जाणवत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज कोतकर मित्र मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते. करोना संसर्ग विषाणूमुळे नागरिक भयभीत आहेत. या संकटाने आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. या काळात इतर आजारी रुग्णांना रक्ताची अत्यंतिक गरज भासत आहे. परंतु अशावेळी रक्त पुरवठा करणे जिकरीचे झाले असल्याने हे शिबिर अत्यंत महत्वाचे असल्याचे कोतकर म्हणाले.
श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनानिमित्त व तसेच मंदिरासाठी कारसेवकांच्या बलिदान प्रित्यर्थ अर्पण रक्तपेढी येथे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोतकर मित्रमंडळाचे पदाधिकारी ओंकार कोतकर, सागर शिरोळे, बंटी वीरकर, सुहास साळुंके, योगेश आंबेकर, निखिल जाधव, राहुल नराळ, संग्राम गोसावी, अनमोल वाडेकर, संकेत बडे, अजिंक्य कोतकर, आकाश पुरुषोत्तम, वेदांग गांधी, शुभम बोरा, नीकेश गवळी आदी यावेळी उपस्थित होते.





