Pune District : विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शाळा संवर्धनाची गरज

डॉ. अमोल बेनके : शाळांचा दर्जा उंचवण्यासाठी अर्थसंपदाचे उल्लेखनीय कार्य
नारायणगाव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्या आणि परिस्थितीने गरीब असणार्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शाळेचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे डॉ.अमोल बेनके यांनी प्रतिपादन केले.
माजी आमदार स्व. वल्लभ बेनके यांच्या जयंती निमित्त वारुळवाडी (ता. जुन्नर) बीट मधील जिल्हा परिषदेच्या 13 प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक वस्तूंचे वाटप डॉक्टर अमोल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी डॉ. बेनके बोलत होते.
डॉ. बेनके म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा उंचवला पाहिजे या दृष्टिकोनातून अर्थसंपदा पतसंस्था उल्लेखनीय कार्य करत असून आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे बेनके यांनी नमूद केले. याप्रसंगी अर्थसंपदा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश मेहेत्रे, उपाध्यक्ष विलास पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायणगाव शहराध्यक्ष शेखर ढवळे , सुरज वाजगे, केंद्रप्रमुख दिनेश मेहेर, संचालक अनंत भोर, शरद शिंदे, राजेंद्र खिलारी, उत्तम मेहेत्रे, निलेश कोल्हे, रुपेश कानडे, जयेश कोकणे, नितीन शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ठाकरवाडी, वारूळवाडी, आनंदवाडी, नंबरवाडी, वळणवाडी, नारायणवाडी, पाटे खैरे मळा, बागलोहरे गावठाण, कोल्हे मळा, दरंदाळे मळा, नारायणगाव शाळा नं.1, नारायणगाव शाळा नं. 2, नारायणगाव नं. 3(उर्दू शाळा) व हिवरे तर्फे नारायणगाव येथील शाळांमध्ये वह्या व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अर्थसंपदा पतसंस्थेने दत्तक घेतलेल्या ठाकरवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने मदत केली आहे.प्रास्ताविक किसन शेळके यांनी तर मुख्याध्यापक अशोक घोलप यांनी आभार मानले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कला मार्गदर्शक म्हणून योगेश वैद्य तर क्रीडा मार्गदर्शक म्हणून तुळशीदास कोर्हाळे यांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
– रमेश मेहेत्रे, अध्यक्ष, अर्थसंपदा पतसंस्था





