पिंपरी महापालिका भवनात दररोज वाजणार राष्ट्रगीत
Updated On:

पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य भवन व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये रोज राष्ट्रगीत वाजवले जाणार आहे.
प्रशासकीय कार्यालयांमध्ये असा उपक्रम चालू करणारी पिंपरी महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका ठरणार आहे. महापालिकेत दररोज राष्ट्रगीत सुरू करावे, अशी मागणी महापालिका कामगार कर्मचारी सेनेचे शहराध्यक्ष रुपेश पटेकर यांनी केली होती. मनसेच्या या मागणीला यश आले आहे. मनसेची मागणी मान्य केल्याबद्दल मनसेचे गणेश सातपुते, शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेऊन सत्कार केला.




