गुगल मॅप्सवरही बदलले दिल्लीतील ‘या’ रोडचे नाव; आपने साधला भाजपवर निशाणा

Delhi News | दिल्लीमध्ये रस्त्याचे नाव बदलण्यावरून पुन्हा एकदा राजकीय गोंधळ वाढला आहे. भाजप खासदारांमध्ये तुघलक लेन येथील त्यांच्या बंगल्याबाहेर स्वामी विवेकानंद मार्ग नावाची पाटी लावण्याची स्पर्धा सुरू आहे. फरिदाबादचे खासदार आणि केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर यांनी शुक्रवारी त्यांच्या बंगल्यात स्वामी विवेकानंद मार्गाचा फलक लावला.
आता गुगल मॅप्सवरही या लेनचे नाव स्वामी विवेकानंद मार्ग असे दिसत आहे. यापूर्वी, भाजप खासदार दिनेश शर्मा यांनी त्यांच्या बंगल्यावर स्वामी विवेकानंद मार्ग या नावाची प्लेट लावली होती. येथील इतर बंगल्यांवरही आता हाच नियम पाळला जात आहे. या प्रकरणामुळे एका नवीन वादाला तोंड फुटले आहे.
आज नई दिल्ली स्थित नए आवास स्वामी विवेकानंद मार्ग (तुगलक लेन) में सपरिवार विधि विधानपूर्वक, पूजन-अर्चन कर गृह प्रवेश किया।@narendramodi @JPNadda @AmitShah @blsanthosh @myogiadityanath @idharampalsingh @pmoindia @BJP4India @BJP4UP pic.twitter.com/BayBC9JK9W
— Dr Dinesh Sharma BJP (@drdineshbjp) March 6, 2025
दिल्ली महापालिकेच्या नोंदींनुसार आजही या रस्त्याचे नाव तुघलक लेन असेच आहे. केंद्रीय मंत्री कृष्णपाल गुर्जर म्हणाले की, स्वामी विवेकानंद हे भारतीय तरुणांचे आदर्श आहेत आणि त्यांच्या नावाशी लोकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. हा राजकीय प्रश्न नाही तर श्रद्धेचा प्रश्न आहे. स्वामी विवेकानंदांच्या आदर्शांवर विश्वास असल्यामुळे हे नाव लिहिले गेले आहे. दरम्यान, नामकरण प्रक्रिया अधिकृत नसल्यामुळे अनेकांनी हे पाऊल राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे वर्णन केले आहे. Delhi News |
आम आदमी पक्षाचा भाजपवर निशाणा
मुघल शासकांच्या नावावर असलेल्या रस्त्यांची नावे बदलल्याबद्दल आम आदमी पक्षाने भाजपवर निशाणा साधला आहे. आपचे खासदार संजय सिंह म्हणाले की, एकीकडे भाजपचे केंद्रीय मंत्री रस्त्यांवरून मुघल शासकांची नावे बदलत आहेत आणि दुसरीकडे पंतप्रधान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ताजमहाल दाखवत आहेत. स्वातंत्र्यानंतर देशातील सर्व पंतप्रधान १५ ऑगस्ट रोजी मुघल शासकाने बांधलेल्या लाल किल्ल्यावर जातात आणि भाषण देतात. पण भाजप नेते परदेशी पाहुण्यांना मुघल स्थळे का दाखवतात? मुघल काळातील राज्यकर्त्यांवर चर्चा झाली पाहिजे. पण मग त्यांनी मुघलांनी बांधलेली ठिकाणे परदेशी नेत्यांना दाखवू नये,’ असे म्हणत भाजपवर हल्लाबोल केला आहे. Delhi News |
हेही वाचा:





