Upcoming Movies: सिकंदर ते देवा… 2025 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार ‘हे’ 5 बिग बजेट चित्रपट

List of Hindi films of 2025 : 2024 हे वर्ष बॉलिवूडसाठी खास ठरले. यावर्षात अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई केली. पुष्पा-2, कल्की 2898 एडी, स्त्री-2, देवारा-पार्ट 1, भुल भुलैय्या सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचे विक्रम केले. 2024 नंतर आता 2025 देखील हिंदी चित्रपटांसाठी खास असणार आहे. नववर्षात अनेक शानदार चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळतील. नवीन वर्षात रिलीज होणाऱ्या अशाच काही चित्रपटांविषयी जाणून घेऊयात.
कांतारा: चॅप्टर 1
वर्ष 2022 मध्ये आलेल्या कांतारा चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये या चित्रपटाला रिलीज करण्यात आले होते. या चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी ‘कांतारा: चॅप्टर 1’ प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे. हा चित्रपट 2 ऑक्टोबर 2025 ला रिलीज होईल.
देवा
‘देवा’ चित्रपटातून अभिनेता शाहिद कपूर प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत काम करताना दिसणार आहे. रोशन अँड्यूज दिग्दर्शित हा चित्रपट 31 जानेवारी 2025 ला रिलीज होईल. शाहिदसोबत पुजा हेगडेची देखील चित्रपटात प्रमुख भूमिका आहे.
सिंकदर
सलमान खानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमानचा हा चित्रपट ईद 2025 ला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल या चित्रपटात रश्मिका मंदाना, शर्मन जोशी आणि सत्यराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ए.आर. मुरुगदास याचे दिग्दर्शक आहे.
वॉर-2
‘यश राज फिल्म्स’च्या स्पाय यूनिव्हर्समधील चित्रपटांना प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. या यूनिव्हर्समधील ‘वॉर 2’ हा आगामी चित्रपट वर्ष 2025 मध्ये रिलीज होईल. चित्रपटात ऋतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर प्रमुख भूमिकेत असतील. हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 ला रिलीज होणार आहे.
हाऊसफुल 5
‘हाउसफुल 5’ नवीन वर्षात प्रेक्षकांना हसवायला येत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त सारखी मोठी स्टार कास्ट आहे. चित्रपट जून 2025 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.





