Jr. NTR : साऊथ सिनेमातून थेट बॅालीवूडमध्ये एन्ट्री करत दाक्षिणात्य अभिनेता ज्युनिअर एनटीआर याने त्याच्या वॅार २ सिनेमातून धमाकेदार एन्ट्री केली. या सिनेमाने चांगली कमाई केली आहे. मात्र, जितकी अपेक्षा होती, त्या प्रमाणात या सिनेमाला गल्ला गोळा करता आलेला नाही. अशातच आता ज्युनिअर एनटीआरच्या त्याच्या दोन मोठ्या सिनेमांची घोषणा करण्यात आली आहे.
इंडस्ट्रीतील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, वॉर २ नंतर ज्युनिअर एनटीआरचे दोन मोठे प्रोजेक्ट्सची सुरुवात केली जाणार आहे. या सिनेमांपैकी एका सिनेमाच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. देवरा २ असं या सिनेमाच नाव आहे. या सिनेमाच दिग्दर्शन प्रशांत नील करणार आहेत. तर दुसऱ्या सिनेमाच नाव अद्याप समोर आलेलं नाही. तसेच ज्युनिअर एनटीआरच्या आणखी काही सिनेमांची चर्चा होत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ज्युनिअर एनटीआरची सुरुवातीपासूनच ही योजना होती की, ‘वॉर २’ नंतर तो सर्वप्रथम प्रशांत नीलच्या सिनेमावर काम करेल. देवरा २ ऐवजी या सिनेमाचं टेंटेटिव्ह टायटल ‘ड्रॅगन’ असं ठेवण्यात आलं आहे. देवरा हा ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा सिनेमा आहे. त्याचा हा सिनेमा सीक्वल असणार आहे.
२०२४ मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला होता. सध्या जान्हवी तिच्या परम सुंदरी सिनेमाच्या प्रेमोशनमध्ये बिझी आहे. यामुळे देवरा २ मध्ये कोणती अभिनेत्री दिसणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.






