War 2 VS Coolie : बॅाक्स अॅाफिसवर जोरदार टक्कर, पण पहिल्या दिवशी कोण ठरलं वरचढ? पाहा कलेक्शन…

War 2 VS Coolie : १४ अॅागस्ट या दिवशी दोन मोठे सिनेमे रिलीज झाले आहेत. दोन्ही सिनेमांचं प्रेक्षक कौतुक करताना पाहायला मिळत आहे. हृतिक आणि ज्युनिअर एनटीआर यांचा वॅार २ आणि रजनीकांत यांचा कुली या सिनेमांनी प्रेक्षकांना वेड लावलं आहे. दोन्ही सिनेमांची बॅाक्स अॅाफिसवर जोरदार टक्कर झाली असून, पहिल्या दिवशी बॅाक्स अॅफिस कलेक्शनमध्ये कुणी बाजी मारली आहे, याचं पहिल्या दिवशीचं बॅाक्स अॅाफिस कलेक्शनची आकडेवारी समाेर आली आहे.
वॅार २ हा सिनेमा २०१९ मध्ये आलेल्या वॅार या सिनेमाचा सिक्वल आहे. या सिनेमात हृतिक रोशन, ज्युनिअर एनटीआर आणि अभिनेत्री कियारी अडवाणी आहे. हा एक अॅक्शनपट सिनेमा आहे. या सिनेमाच दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केलं आहे.
‘वॉर 2’ या स्पाय-अॅक्शन थ्रिलर सिनेमाने पहिल्या दिवशी बंपर कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘वॉर 2’ सिनेमाच ओपनिंग डे कलेक्शन 52.50 कोटी रुपये झालं आहे. यामुळे वॅार २ सुपरस्टार रजनीकांत यांच्या कुली सिनेमाला तगडी फायट देताना दिसत आहे.
साऊथ सिनेमांचा देव मानणाऱ्या आपल्या लाडका अभिनेता रजनीकांत यांचा कुली सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. या सिनेमाने वॅार २ पुढे कमाईच्या बाबतीत तगडं आव्हान उभं केलं आहे. या सिनेमात रजनीकांत यांच्याशिवाय नागार्जुन, श्रुती हसन, सत्यराज आणि आमिर खान अशा तगड्या कलाकरांची कास्ट आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केलं आहे. हा सिनेमा तमिळ, हिंदी, तेलगू आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.
कुलीच बाजी मारणार ?





