सायकल स्वारीतून दिला लसीकरणाचा संदेश

पुणे – देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याच दरम्यान पुण्यातील काही सायकल प्रेमींनी अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पहाटे पी.एस. ट्रायथलिट ग्रुपच्या आठ सायकल स्वारांनी पुणे ते गेट वे ऑफ इंडिया असा 165 किलोमीटरचा प्रवास करत सोबत प्रत्येकाने पुढे येऊन लसीकरण करा असा संदेश देत स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पी.एस. ट्रायथलिट ग्रुपच्या वतीने हा सांमाजिक उपक्रम राबविण्यात आला..शनिवारवाडा पुणे येथे पहाटे पाच वाजता झेंडा दाखवून सायकल प्रवासाला सुरुवात करण्यात आली ही सायकल स्वारी (आर्यंनमँन) प्रसाद शिंदेच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सात सहकाऱ्यांनी यशस्वी पुर्ण केली.
करा लसीचा निर्धार_कोरोना होईलं हद्दपार..
लस घ्या लस..नका करू आ’लस..
कोरोना लस घेण्याचा करा निर्धार, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी हाही एक आधार !असे विविध बँनर लावून कोरोना लसीकरण विषयी जनजागृती या सायकलस्वारी दरम्यान केली गेली.सर्व सायकलस्वार 165 किलोमीटर अंतर पार करून सहा तासात मध्ये गेट ऑफ इंडिया मुंबई येथे पोहोचले.





