पुणे शहरातील पारा ४३ अंशांवर
Updated On:

पुणे – शहरासह जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी कमाल तापमानात फारसा बदल न झाल्याने उष्णतेचा चटका अंगाची लाहीलाही करत होता. गेल्या २४ तासांत लोहगाव परिसरात तापमानात किंचित घट झाली असून, आज कमाल तापमान ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
तर कोरेगाव पार्क येथे ४१.२, शिवाजीनगरला ४०.५, चिंचवड परिसरात ४०.१, एनडीएला ३८.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही, हवामान कोरडे आणि आकाश निरभ्र राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.





