BMC Election 2026 : “मुंबईचा महापौर ‘वंदे मातरम’ म्हणणारा ‘मराठी माणूस’ असेल”; शिवसेना नेत्याचं विधान चर्चेत.!
Updated On:

BMC Election 2026 – महायुतीचे राजकारण मुंबई प्रथम यावर आधारित आहे. मुंबईचा महापौर हा ‘मराठी माणूस’ असेल आणि तो ‘वंदे मातरम’ म्हणणारा असेल, असे शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना शायना एनसी म्हणाल्या, मुंबईचा महापौर तोच असेल जो ‘वंदे मातरम’ म्हणेल. महायुतीचा महापौर तोच असेल ज्याला शहरावर प्रेम आहे आणि विकासाची इच्छा आहे. तो एक मराठी माणूसच असेल. त्यांनी विरोधकांवर द्वेषाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला.
मुंबईत निवडणुका जवळ येत असताना देशाच्या आर्थिक राजधानीच्या पुढील महापौरांबद्दलची चर्चा अधिकच तीव्र होत आहे. ठाकरेबंधू यांनी मुंबईचा महापौर मराठीच असेल, असे ठामपणे सांगितले आहे. एका सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर मराठी हिंदू असेल, अशी घोषणा केली होती.





