महायुतीने शेवटच्या घटकाला केंद्र बिंदू मानून अनेक योजना आणल्या – डाॅ. नीलम गोऱ्हे

पुणे – महायुती सरकारने शेवटच्या घटकाला केंद्र बिंदू माणून अनेक योजना आणल्या. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला भगिनींना सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगला जनादेश मिळेल, असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महिला आघाडीने अनेक तेजोमय दिव्यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी पुण्यासह राज्यातील कानाकोपऱ्यातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. आत्तापर्यंतच्या यशाच्या वाटचालीमध्ये खंबीर सहकार्य मिळाल्याबद्दल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसैनिक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचे डाॅ. गोऱ्हे यांनी आभार मानले. तसेच आगामी विधानसभा निवडणुक आम्ही एकत्र लढवणार. मुख्यमंत्रीपदाच्या चेहर्याबाबत सर्व पक्षांचे नेते मिळून निर्णय घेतात. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जावी आणि तेच मुख्यमंत्री रहावेत अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
सहा राज्यातल्या विधान परिषदेचे सभापती आणि विधान सभेचे अध्यक्षांना बोलवून एक वैचारिक गोलमेज परिषद घेण्याचा विचार आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीनंतर आता राजकीय महत्वाकांक्षा काहीच नाही. पक्षाकडून जी जबाबदारी मिळेल ती शिवसैनिक म्हणून पूर्ण करेल. यावेळी विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे यासह मान्यवर उपस्थित होते.
ललित लिखाणाबरोबर कथा आणि कादंबरी याच्या माध्यमातून रसिक वाचकांशी जोडले जाण्यासाठी काम करणार आहे. तसेच पुण्यातील वाहतुक कोंडीची प्रश्न, स्त्रियांच्या सुरक्षिततेचे प्रश्न, कौशल्य विकासमध्ये महिलांना सहभागी करून घेण्याचा कामाला प्राधान्य असेल.
डाॅ. नीलम गोऱ्हे – उपसभापती, विधानपरिषद





