पुणेकरांनो, शहरातील नवीन ‘कंटेन्मेंट’ झोनची यादी वाचलीत का?

पुणे – महापालिकेने नव्याने 71 प्रतिबंधित क्षेत्राची यादी जाहीर केली असून, त्यामध्ये 17 क्षेत्र नव्याने समाविष्ट झाले आहेत. तर 20 क्षेत्र वगळण्यात आले आहेत.
दि. सप्टेंबर रोजी महापालिकेने 74 प्रतिबंधित क्षेत्रांची नावे जाहीर केली होती त्यामध्ये 35 क्षेत्रांचा नव्याने समावेश केला होता. यंदा 17 क्षेत्रांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे तर तीन ने क्षेत्र कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहराच्या उपनगराच्या भागात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
यावेळी जाहीर केलेल्या नव्या प्रतिबंधित क्षेत्रात कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या कोंढवा आणि धनकवडी परिसरातील सर्वाधिक भाग आहे. त्यानंतर वडगाव बुद्रुक-खुर्द, धायरी, वडगावशेरी, शिवाजीनगर, भांबुर्डा, घोरपडी या भागाचा समावेश आहे. याशिवाय पूर्वीचे कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, पर्वती लक्ष्मी नगर, गुरुवार पेठ, महात्मा फुले, घोरपडी पेठ, वारजे कर्वेनगर ,कोथरूड, बावधन, औंध ,बाणेर परिसरातील पूर्वीचा भाग सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कायम आहे.
नव्याने समाविष्ट झालेले क्षेत्र –
- ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालय – घोरपडी सर्व्हे नं. 49 आणि 45 मधील अनुक्रमे पाम ग्रु आणि लक्ष्मी टेरेस सोसायटी.
- शिवाजीनगर घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालय -भांबुर्डा, आशानगर को-ऑप हौसिंग सोसायटी आणि गोखलेनगर
- नगररस्ता-वडगावशेरी – कुमार प्राइम वेरा
- सिंहगडरस्ता – वडगावखुर्दमधेल मॅंगो नेस्ट सोसायटी, वडगाव बुद्रुकमधील सनसिटी रस्ता, हिंगणे खुर्दमधील आनंदनगर, धायरी गल्ली नं. 17
- कोंढवा – येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय – धनकवडी बालाजीनगर येथील सिद्धी हॉस्पिटल परिसर आणि खुशबू हॉस्टेल परिसर, काशिनाथ पाटील नगर, पवार हॉस्पिटल परिसर, रजनी कॉर्नर, कोंढवा बुद्रुक मधील शांतीनगर सोसायटी आणि साळवे गार्डन परिसर, कपीलनगर, लक्ष्मीनगर, साईनगर.





