Vladimir Putin : ब्लादिमिर पुतीन यांना भ्याड म्हणणाऱ्या नेत्याला ४ वर्षांची शिक्षा
Updated On:

Vladimir Putin – रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांना भ्याड म्हणणाऱ्या युक्रेनमधील फुटिर नेत्याला रशियामध्ये ४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इगोर गिरकिन उर्फ स्ट्रेलकोव असे या फुटिर नेत्याचे नाव आहे. स्टेरेलकोव या रशियन शब्दाचा अर्थ शूटर अससा होतो.
रशियाच्या पाठिंब्यावर युक्रेनच्या दोनेत्सक प्रांतात २०१४ मध्ये लढणार् या प्रमुख फुटिर नेत्यांपैकी ते एक आहेत. रशिया आणि युक्रेनच्या सांघिक आघाडीच्या अध्यक्षांना युक्रेनमधून हटवल्यानंतर हे बंडखोर लढत होते.
ते रशियाला परतल्यानंतर राष्ट्रवादी टीकाकार आणि कार्यकर्ते बनले होते. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याला त्यांनी पाठिंबा दिला होता. मात्र युद्ध निती अयोग्य आणि अनिर्णित ठेवल्याबद्दल त्यांनी पुतीन यांच्यावर जोरदार टीका केली होती.





