ज्ञानदीप लावू जगी : दुःख कोणालाही नको
Updated On:

-अतुल महाराज शास्त्री
जिये लोकीचा चंद्र क्षयरोगी । जेथ उदय होय अस्तालागी। दुःख लेऊनि सुखाची आंगी । सळित जगाते ।।
मानवी मन हे केवळ सुखाचा शोध घेत असते. सुखाची अपेक्षा सगळ्यांना आहे. दुःख कोणालाही नको आहे. माऊली म्हणतात, येथील चंद्रालासुद्धा क्षय आहे, त्याचप्रमाणे सूर्यसुद्धा उदयाला येतो तो फक्त अस्त होण्यासाठीच.
दुःख होण्याचे कारण ज्ञानोबाराय सांगतात, आपल्याला वाटतं वेगवेगळे विषय मिळाल्यावर सुख मिळेल, पण ते सुख नसतंच, आपण ते समजतो. मुळात दुखःच असतं. आपण फसतो ते इथेच. विषयजात मुळातच दुखःरूप आहेत. नखशिखांत सुखस्वरूप आहे तो परमात्मा व त्या साजूक सुखाचा मार्ग आहे भक्ती.





