उत्तर भारतात थंडीची पकड घट्ट ! राजधानी दिल्लीवर पसरले धुक्याचे साम्राज
Updated On:

Weather Update – थंडीच्या लाटेने उत्तर भारतावर आपली पकड घट्ट केली असून अनेक ठिकाणी धुक्याचीही दाट चादर पसरत आहे. राजधानी दिल्ली आज नेहमीपेक्षा अधिक गारठली असून तेथे धुक्याचेही साम्राज पसरले आहे. सोमवारी सकाळी दिल्लीचे तापमान ९.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, असे भारतीय हवामान खात्याने सांगितले.
दिल्लीच्या अनेक भागांमध्ये दृश्यमानता १२५ मीटरपर्यंत घसरली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या बहुतांश भागातही कमी दृश्यमानता अनुभवली. कडाक्याच्या थंडीमुळे अनेकांनी राष्ट्रीय राजधानीच्या विविध भागात दिल्ली सरकारच्या नाईट शेल्टरचा आश्रय घेतला.
दिल्ली सह राजस्थान, पंजाब, हरियाना, जम्मू काश्मीर उत्तरप्रदेश अशा राज्यांमध्येही पारा घसरत चालला असून लोकांना कडाक्याची थंडी अनुभवता येऊ लागली आहे. हिमाचल आणि काश्मीरच्या काही भागात बर्फवृष्टीही झाल्याचे वृत्त आहे.





