The Great Khali Accident : WWE रेसलर द ग्रेट खलीच्या गाडीचा अपघात! महामार्गावरून जाताना अचानक…
The Great Khali Accident : अपघातानंतर महामार्गावर खली यांना पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.

The Great Khali Accident : WWE रेसलर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करणारे द ग्रेट खली यांच्या गाडीला हरियाणातील पानिपत टोल प्लाझाजवळ अपघात झाला. हे. कुरुक्षेत्राहून सोनीपतच्या दिशेने जात असताना महामार्गावर खली यांच्या फॉर्च्यूनर गाडीची एका इनोवा कारशी जोरदार धडक झाली.
सुदैवाने या घटनेत खली आणि त्यांचे ड्रायव्हर पूर्णपणे सुरक्षित असून त्यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. अपघातानंतर महामार्गावर खली यांना पाहण्यासाठी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती.
सकाळी साडेदहाच्या सुमारास पानिपतमधील जीटी रोडवर बाबरपूर वाहतूक पोलीस ठाण्याजवळ ही घटना घडली. खली यांच्या गाडीच्या पुढे एक इनोवा कार चालली होती. रस्त्यावर साइड घेण्याच्या प्रयत्नात इनोवा चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे मागेच असलेल्या खली यांच्या फॉर्च्यूनरची इनोवाला मागून जोरदार धडक बसली.
फॉर्च्यूनर गाडीच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान
या धडकेमुळे खली यांच्या फॉर्च्यूनर गाडीच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आणि गाडी जागीच बंद पडली. धडक फार तीव्र नसल्याने गाडीत बसलेले ग्रेट खली आणि त्यांचा ड्रायव्हर दोघेही पूर्णपणे सुरक्षित आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पानिपत वाहतूक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पण खली यांनी समजूतदारपणे हे प्रकरण हाताळत इनोवा चालकाविरुद्ध कोणतीही कायदेशीर तक्रार दाखल करण्यास नकार दिला. घटनेनंतर द ग्रेट खली काही वेळ घटनास्थळी थांबले. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर ते त्यांच्या दुसऱ्या गाडीत बसून पुढील प्रवासासाठी रवाना झाले.
खली यांच्यासह सर्वजण सुरक्षित
या अपघातात कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. मात्र, या अपघातात गाडीचे थोडे नुकसान झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजे वेळेवर गाडीवर नियंत्रण मिळवता आल्यामुळे एक मोठा संभाव्य अपघात टळला.
हेही वाचा:






