Accident : हरिश्चंद्रीत कंटेनरखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू; अपूर्ण रस्त्यांच्या कामांवर ग्रामस्थ संतप्त
Accident : पुणे-सातारा महामार्गावरील हरिश्चंद्री येथे कंटेनरखाली सापडून दुचाकीस्वाराचा मृत्यू. अपूर्ण रस्त्यांच्या कामांवर ग्रामस्थांचा संताप.

Accident : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील हरिश्चंद्री येथे कंटेनरखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान, परिसरातील रस्त्यांची अपूर्ण कामे आणि खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याचे रुंदीकरण, उड्डाणपूल आणि सर्व्हिस रोडची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अपघात टाळण्यासाठी रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करावीत आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या अपघाताचा आणि ग्रामस्थांच्या मागण्यांचा आढावा आपले प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी घेतला आहे.





