पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे ४ वाजून ५९ मिनिटांनी विसर्जन
Updated On:

GaneshVisarjan 2025 | पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. पुण्याचे पहिले तीन मानाचे गणपती विसर्जन झाल्यानंतर आता मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे देखील विसर्जन झाले आहे. ४ वाजून ५९ मिनिटांनी या गणपतीचे विसर्जन झाले आहे.
यंदा या मंडळाने साकारलेल्या वृंदावन देखाव्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. तसेच या मंडळाने देखील विसर्जन मिरवणूक वेळेत संपवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. यंदाचे या मंडळाचे १२५ वे वर्ष असल्याने सदस्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण होते. राधे राधेचा फुलांनी सजविलेला आकर्षक रथ अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. GaneshVisarjan 2025 |





