Pune District : आळे येथे वनविभागाने लावला पिंजरा
Updated On:

बेल्हे : गेले दहा दिवस बिबट्याची प्रचंड प्रमाणात दहशत आळे (ता. जुन्नर) येथे असून पाचीचा मळा या ठिकाणी अखेर वनविभाग आळेचे बीट प्रमुख के.जी. भालेराव, आळे ग्रामस्थ गणेश शिंदे व सहकार्यांनी यांनी येथे पिंजरा लावला आहे.
तसेच मळ्यातील सर्व नागरिकांना सावधानतेच्या सूचना दिल्या आहेत. आळे येथील अनेक भागांमध्ये भर दिवसा नागरिकांना बिबट्या दर्शन देत असल्यामुळे बिबट्यांची मोठ्या प्रमाणात भीती नागरिकांमध्ये पसरली आहे.
ज्या भागात बिबट्या दिसतोय त्या ठिकाणी वन विभागाने तात्काळ पिंजरे लावावेत असे आवाहन आळेगावच्या सरपंच सविता भुजबळ, उपसरपंच मंगेश कुर्हाडे यांनी केले आहे.





