‘कांतारा: चॅप्टर 1’ चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर; ऋषभ शेट्टीचा खतरनाक लुक

Kantara Chapter 1 New Poster | दाक्षिणात्य अभिनेता ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा: चॅप्टर 1’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आज वाढदिवसानिमित्त त्याने चाहत्यांना सरप्राइज दिले आहे. बहुप्रतिक्षित ‘कांतारा: चॅप्टर 1’चा जबरदस्त पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
‘कांतारा: चॅप्टर 1’ च्या पोस्टरमध्ये ऋषभ शेट्टीचा रूद्र अवतार पाहायला मिळत आहे. यामध्ये हातात शस्त्र घेऊन ऋषभ खूपच आक्रमक दिसत आहेत.निर्मात्यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया हँडलवरून ‘कांतारा: चॅप्टर 1’चे नवीन पोस्टर शेअर करून त्याला हटके कॅप्शन दिलं आहे.
चित्रपटाच्या पोस्टर मध्ये एक अत्यंत भव्य युद्ध दृश्य पाहायला मिळत आहे. कन्नड आणि हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट चाहते इंग्रजी, तमिळ, तेलुगूसह एकूण सात भाषांमध्ये पाहू शकतील. निर्मात्यांनी सात वेगवेगळ्या भाषांमधील पोस्टरही शेअर केले आहेत.
View this post on Instagram
2022 साली प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ चित्रपटाला मोठे यश मिळाले होते. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाही, तर भारतीय संस्कृती आणि लोक कथांना जागतिक व्यासपीठावर सादर केले. त्यामुळे चाहते आता ‘कांतारा: चॅप्टर 1’ची आतुरतेने वाट पाहत आहेत.
कांताराबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. याचं दिग्दर्शनही ऋषभनेच केलं होतं. 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात 309 कोटी रुपये कमावले होते. तर जागतिक स्तरावर या चित्रपटाने 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. यानंतर आता ‘कांतारा: चॅप्टर 1’ चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा:
हिंजवडी : महापारेषणच्या भूमिगत वीज वाहिनीत बिघाड; आयटी हब अंधारात





