एका महिन्यात दुसऱ्यांदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार ‘कांतारा चॅप्टर 1’; ‘या’ भाषेत सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Rishab Shetty | Kantara Chapter 1 : ‘कांतारा चॅप्टर 1’ सध्या चर्चेत असून, या चित्रपटाने 2 ऑक्टोबरला प्रदर्शित झाल्यानंतर आतापर्यंत तब्बल 765 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांच्या कमाईचा विक्रम मोडला असून, बॉक्स ऑफिसवर दिवसेंदिवस यश मिळवत आहे.
आता या चित्रपटासंदर्भात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे, ‘कांतारा चॅप्टर 1’ लवकरच इंग्रजी भाषेत पुन्हा एकदा थिएटर्समध्ये दाखल होणार आहे. या कन्नड हिट चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी बुधवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.
त्यांनी लिहिले, “एक अशी पवित्र गाथा जी सीमांपलीकडे आणि भाषेपलीकडे जाते! ‘कांतारा चॅप्टर 1’ चा इंग्रजी व्हर्जन 31 ऑक्टोबरपासून जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होईल. श्रद्धा, संस्कृती आणि भक्तीच्या या महाकाव्य प्रवासाचा अनुभव पूर्ण वैभवात घ्या.” असं त्यांनी म्हंटलं आहे.
A divine saga that resonates beyond borders and languages! 🕉️✨#KantaraChapter1 𝐄𝐧𝐠𝐥𝐢𝐬𝐡 𝐕𝐞𝐫𝐬𝐢𝐨𝐧 releasing in cinemas worldwide from 𝐎𝐜𝐭𝐨𝐛𝐞𝐫 𝟑𝟏𝐬𝐭.
Experience the epic journey of faith, culture, and devotion in all its glory ❤️🔥#KantaraInCinemasNow… pic.twitter.com/TLw4F8bI6C— Rishab Shetty (@shetty_rishab) October 22, 2025
पोस्टरनुसार, मूळ चित्रपटाची कालावधी 2 तास 48 मिनिटे आहे, मात्र इंग्रजी आवृत्ती 2 तास 14 मिनिटांची असेल. चित्रपट निर्मात्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘कांतारा चॅप्टर 1’ हा भारतातील पहिला असा चित्रपट असेल ज्याची इंग्रजी डब आवृत्ती मूळ प्रदर्शनानंतर इतक्या कमी कालावधीत जगभर प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट म्हणजे 2022 साली प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ या सुपरहिट चित्रपटाचा प्रीक्वल आहे. या चित्रपटात तुलू परंपरेतील दैव कोला या प्राचीन श्रद्धेचा जागतिक स्तरावर परिचय करून देण्यात आला होता.
प्री-औपनिवेशिक भारताच्या पार्श्वभूमीवर आधारित या कथेत ‘बेर्मे’ (ऋषभ शेट्टी) नावाच्या एका आदिवासी माणसाची गोष्ट सांगितली आहे, जो आपल्या समाजाच्या सन्मानासाठी सत्ताधारी वर्गाविरुद्ध लढा देतो.
या चित्रपटात रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया आणि जयराम यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका असून, हा चित्रपट होमबाले फिल्म्स या बॅनरखाली निर्मित करण्यात आला आहे.





