कांतारा चॅप्टर 1 सिनेमावर रितेश देशमुखकडून कौतुकाचा वर्षाव; सोशल मीडियावर पोस्ट, म्हणाला “खरोखरच एक….”

Riteish Deshmukh : सध्या कांतारा चॅप्टर 1 हा सिनेमा बॅाक्स अॅाफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये अनेक मोठ्या सिनेमांचं रेकॅार्ड ब्रेक केलं आहे. दसऱ्याच्या आदली दिवशी रिलीज झालेल्या या सिनेमाने 100 कोटींहून अधिकचं बॅाक्स अॅाफिस कलेक्शन गोळा करत नवा इतिहास रचला आहे. आता हा आकडा आणखी वाढला आहे. सिनेमांच प्रेक्षक भरभरून कौतुक करत आहेत.
सिनेमा इंडस्ट्रीतील कलाकारांनीही कांतारा चॅप्टर 1 सिनेमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर नोंदवत आहेत. नुकताच अभिनेता रितेश देशमुख याने कांतारा चॅप्टर 1 हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन पाहिला आहे. या सिनेमाविषयी रितेशने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत या सिनेमाविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कांतारा चॅप्टर 1 पाहणे खरोखरच एक मोठा भारतीय चित्रपट पाहण्याचा अनुभव होता. या ब्लॉकबस्टर यशासाठी अभूतपूर्व सिनेमा बनवल्याबद्दल निर्माते आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन. असं पोस्टमध्ये रितेशने म्हटलं आहे. रितेशने शेअर केलली पोस्ट या सिनेमातील अभिनेत्री रुक्मिणी वसंती हिने रिशेअर केली आहे.
Thank you for the love and appreciation Sir🤍 https://t.co/WI1pYlLfvl
— rukmini (@rukminitweets) October 6, 2025
आयमॅक्समध्ये #कंताराचॅप्टर १ पाहणे – खरोखरच एक मोठा भारतीय चित्रपट पाहण्याचा अनुभव होता. तुम्ही जे काही करता त्यात तुम्ही अद्भुत आहात, मग ते अभिनेता असो, लेखक असो किंवा दिग्दर्शक असो, तुमचा अभिनय पिढ्यांना प्रेरणा देईल असा आहे. मी जे पाहिले ते जादूपेक्षा कमी नव्हते. उत्कृष्ट व्हीएफएक्स, अॅक्शन, उत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, थरारक बीजीएम, साउंड डिझाइन, प्रोडक्शन डिझाइन. तुम्ही किती अविश्वसनीय अभिनेता आहात तुमच्यासाठी अधिक शक्ती!! या ब्लॉकबस्टर यशासाठी अभूतपूर्व सिनेमा बनवल्याबद्दल निर्माते आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन. अशी पोस्ट अभिनेता रितेश देशमुखने त्याच्या एक्स अकाऊंटवरून शेअर केली आहे.
लवकरच 500 कोटी क्लब
कांतारा चॅप्टर 1 हा सिनेमा बॅाक्स अॅाफिसवर राडा घालत असून, कमाईच्या बाबतीत सिनेमा वरचढ ठरला आहे. अनेक मोठ्या सिनेमांना अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीच्या कांतारा चॅप्टर 1 सिनेमाने मागे टाकलं आहे. या सिनेमाने देशभरात 255.75 कोटींची कमाई केली असून, या सिनेमाने वल्डवाईड कलेक्शन 326 कोटींची कमाई करत घवघवीत यश मिळवलं आहे. येत्या काही दिवसांमध्येच कांतारा चॅप्टर 1 सिनेमा 500 कोटींच्या कल्बमध्ये सामील होईल, असं सांगितलं जात आहे.
हेही वाचा : “आम्ही त्यांची इतकी मतं कमी करू की…” ; प्रशांत किशोर यांचा INDIA आणि NDA वर थेट हल्लाबोल





