‘आँखों की गुस्ताखियां’ चित्रपटाचे पहिलं पोस्टर समोर; विक्रांत मेस्सीसोबत शनाया कपूर करणार रोमान्स

‘Aankhon Ki Gustakhiyaan’ : ‘आँखों की गुस्ताखियां’ या चित्रपटाद्वारे अभिनेता विक्रांत मेस्सी आणि शनाया कपूर प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा एक लव्हस्टोरी चित्रपट असणार आहे. मानसी बागला यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. शनाया कपूर बॅालीवूडमध्ये या चित्रपटातून एन्ट्री करणार असून, चित्रपटात ती मुख्य भूमिकेत असणार आहे.
नुकतेच चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये विक्रांत आणि शनाया जत्रेत एकमेकांसोबत सुंदर प्रेमाचे क्षण घालवताना दिसत आहेत. या चित्रपटाद्वारे शनाया कपूर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तिच्यासोबत विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत असणार आहे.
ही नवी जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. पोस्टरमध्ये दिसणाऱ्या जोडीची पहिली झलक पाहून प्रेक्षकांमध्ये ही जोडी मोठ्या पडद्यावर कोणत्या प्रकारची जादू करणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
View this post on Instagram
विशाल मिश्रा यांच्या संगीताने सजलेला हा चित्रपट केवळ एक प्रेमकथा नाही तर एक सुंदर अनुभूती देणारा चित्रपट प्रेक्षकांसाठी ठरणार आहे. झी स्टुडिओज आणि मिनी फिल्म्स प्रस्तुत, मानसी बागला आणि वरुण बागला यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, दिग्दर्शन संतोष सिंग यांनी केले आहे. आँखों की गुस्ताखियाँ हा चित्रपट ११ जुलै २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.





