Shah Rukh Khan : राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर किंग खान शाहरुखची पहिली प्रतिक्रिया समोर; सगळ्यांचे मानले आभार, म्हणाला पॅापकॅार्न घेऊन तयार ठेवा लवकरच….

Shah Rukh Khan : 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. हे पुरस्कार 2023 च्या चित्रपटांसाठी देण्यात आले आहेत. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कटहल या चित्रपटाने पटकावला आहे. तर शामची आई या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुररस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार विभागून देण्यात आले आहेत. बाॅलिवूडचा किंग खान आणि आत्ताचा आघाडीचा अभिनेता विक्रांत मेस्सी यांच्या नावांची घोषणा या पुरस्कारांसाठी करण्यात आली. शाहरुखला जवान तर विक्रांतला 12th फेल या चित्रपटासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे.
इतक्या वर्षांनी पहिला राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुख खानच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्याची यावर पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शाहरुखने एक्सवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने हा असा क्षण आहे जो तो आयुष्यभर जपेल, असं म्हटलं आहे. याशिवाय त्याने ज्युरी आणि आयबी मंत्रालयाचेही आभार मानले आहे. तसेच हा सन्मान दिल्याबद्दल त्याने भारत सरकारचे आभार मानले आहे.
काय म्हणाला शाहरुख?
नमस्कार आणि आदाब. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल मी कृतज्ञता, अभिमान आणि नम्रतेने भारावून गेलो आहे हे वेगळे सांगायला नको. हा असा क्षण आहे जो मी आयुष्यभर जपून ठेवेन. ज्युरी, अध्यक्ष आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे खूप खूप आभार. ज्यांना मी या सन्मानासाठी पात्र वाटलो त्या सर्वांचे आभार. राजू सर, सिड, अॅटली सर आणि त्यांच्या टीमचे आभार. ज्यांनी मला ‘जवान’मध्ये संधी दिली आणि माझ्यावर विश्वास ठेवला, असं शाहरुखने शेअर केलेल्या व्हिडीओत म्हटलं आहे. त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.
Thank you for honouring me with the National Award. Thanks to the jury, the I&B ministry… Iss samman ke liye Bharat Sarkar ka dhanyawaad. Overwhelmed with the love showered upon me. Half a hug to everyone today…. pic.twitter.com/PDiAG9uuzo
— Shah Rukh Khan (@iamsrk) August 1, 2025
पॉपकॉर्न तयार ठेवा, मी लवकरच…
गेल्या काही दिवसांपूर्वी किंग चित्रपटाच्या शुटिंगवेळी शाहरुखला दुखापत झाल्याची बातमी समोर आली होती. त्याला उपचारांसाठी अमेरिकेला हलविण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले होते. या व्हिडीओत शाहरुखचा हात फ्रक्चर झाल्याचे दिसत आहे. “मला माझे हात पसरून माझे प्रेम वाटायचे आहे, पण मी थोडा आजारी आहे. काळजी करू नका, फक्त पॉपकॉर्न तयार ठेवा. मी लवकरच थिएटरमध्ये परत येईन.” असं आवाहन त्याने प्रेक्षकांना केलं आहे. त्यामुळे शाहरुख त्याच्या आगामी किंग चित्रपटातून दमदार एन्ट्री करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.





