रिंकू राजगुरूचा क्रश कोण? म्हणाली “मराठी इंडस्ट्रीत…”

Rinku Rajguru | अभिनेत्री रिंकू राजगुरूला ‘सैराट’ या चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली आहे. या चित्रपटाच्या यशानंतर तिने मराठी हिंदी चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. याशिवाय ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. अनेक व्हिडिओ आणि फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
आता रिंकू राजगुरूने एका मुलाखतीत तिचा क्रश कोण आहे? याबाबत सांगितले आहे. तुझा क्रश कोण आहे, ज्याच्याबरोबर तुला काम करण्याची इच्छा आहे? असे रिंकूला विचारले. त्यावर ती म्हणाली, “मला सगळ्यांबरोबर काम करायचं आहे. मला एका कोणाचं नाव सांगता येणार नाही. क्रश म्हणून एखाद्या अभिनेत्याचं नाव सांगता येणार नाही. कारण मला खूप लोकं आवडतात. मला विक्रांत मेस्सी, विकी कौशल, कमल हसनजी या सगळ्यांचं काम आवडतं.”
ती पुढे म्हणाली, “मला असं वाटतं की आपण स्मिता पाटील, श्रीदेवी यांच्यासारखी कामं केली पाहिजेत. आपल्या मराठी इंडस्ट्रीत किती चांगले कलाकार आहेत. मला सगळ्या चांगल्या कलाकारांबरोबर काम करायचं आहे”, असे म्हणत रिंकूने सगळ्या चांगल्या कलाकारांबरोबर काम करायचं आहे,” असे तिने सांगितले. Rinku Rajguru |
रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे तर, २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ या चित्रपटामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. सैराटनंतर रिंकूने ‘झिम्मा २’, ‘झुंड’, ‘कागर’ या सिनेमांत काम करत तिची ओळख निर्माण केली. नुकतीच ती सुबोध भावे व प्रार्थना बेहेरे यांच्याबरोबर ‘बेटर हाफची लवस्टोरी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. Rinku Rajguru |
हेही वाचा:





