विक्रांत मेस्सीच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाची निराशजनक सुरुवात

The Sabarmati Film | अभिनेता विक्रांत मेस्सीचा मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट २००२ मध्ये गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनावर आधारित आहे. मात्र या सिनेमाने पहिल्याच दिवशी निराशजनक सुरुवात केली आहे. या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे समोर आले आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘द साबरमती रिपोर्ट’ या सिनेमाने पहिल्या दिवशी दीड कोटी रुपयांचं कलेक्शन केलं आहे. या सिनेमाचं बजेट 50 करोड रुपये आहे. पहिल्याच दिवशी बजेटचा आकडा गाठण्यात हा चित्रपट सध्या खूपच मागे आहे. मात्र आता हा सिनेमा वीकेंडला किती कमाई करणार हे पाहवे लागणार आहे.
गोध्रा घटनेच्या दु:खद घटनेवर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाकडून लोकांना मोठ्या अपेक्षा होत्या. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट सतत चर्चेत राहिला. पण, रिपोर्टनुसार, चित्रपटाची सुरुवात चांगली झालेली नाही. The Sabarmati Film |
या चित्रपटात विक्रांत मॅसी, रिद्धी डोग्रा आणि राशी खन्ना यांनी पत्रकारांच्या भूमिका साकारल्या आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. The Sabarmati Film |
हेही वाचा:





