आणखी एका स्टारकिडची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; विक्रांत मेस्सीसोबत झळकणार

Shanaya Kapoor Debut | अनेक स्टार किडसने बॉलीवूडमध्ये दमदार एंट्री घेतली आहे. यातच आता कपूर घराण्यातील एक लाडकी मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. सोनम कपूरची चुलत बहिण शनाया कपूर आता बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. अभिनेता संजय कपूर आणि महीप संधू यांची मुलगी शनाया कपूर मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
शनाया कपूरने तिच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात केली आहे. शनाया कपूर ‘आँखों की गुस्ताखियां’ चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या चित्रपटात शनाया कपूरसोबत बॉलिवूडचा स्टार विक्रांत मेस्सी दिसणार आहे. ‘आँखों की गुस्ताखियां’ चित्रपटाच्या शूटिंगला रविवारी मुंबईत सुरुवात झाली आहे. या चित्रपटात शनाया आणि विक्रांतचा रोमान्स पाहायला मिळणार आहे. Shanaya Kapoor Debut |
View this post on Instagram
‘आँखों की गुस्ताखियां’ चित्रपटाच्या शूटींगच्या पहिल्या दिवसाचा फोटो शेअर करत शनायाने कॅप्शनमध्ये लिहिले, “प्रेम आंधळं असतं की आंधळं प्रेम असतं? प्रेमात पडणं ही बाब किती विलक्षण आहे. मिनी फिल्म्स तुमच्यासाठी ‘आंखों की गुस्ताखियां’ घेऊन येत आहे, जो रोमान्सचा नवा अनुभव असेल. प्रेम आणि उत्तम संगीताच्या या अविस्मरणीय प्रवासात आमच्यात सामील व्हा”, शनाया देखील तिच्या आगामी चित्रपटासाठी उत्सुक आहे. Shanaya Kapoor Debut |
दरम्यान, विक्रांत मेस्सीने त्याच्या ’12वी फेल’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला होता. त्याच्या आगामी ‘द साबरमती एक्सप्रेस’ चित्रपटाचाही दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून चाहते चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता विक्रांत मेस्सीने ‘आँखों की गुस्ताखियां’ या नवीन रोमँटिक चित्रपटाचं शूटिंग सुरू केले आहे.
हेही वाचा:





