Eid celebrations | देशभरात मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचा मोठा उत्साह साजरा केला जात आहे. रमजान ईद निमित्त एक महिना मुस्लिम बांधवांकडून रोजा – उपवास पाळला जातो. या महिन्यात दानधर्म करणे पवित्र मानले जाते, आजच्या दिवशी या रोजाची उपवासाने सांगता होते. नमाज पठणासाठी पुण्याच्या ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधव या ठिकाणी जमले होते, यावेळी लहानग्या मुलांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वत्र आनंदाचे वातावरण पहायला मिळाले. ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून गोळीबार मैदान परिसरात काटोकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजनही करण्यात आले आहे. दरम्यान, ईद उल फित्र हा रमजान महिन्याचा शेवट असतो, जेव्हा ३० दिवसांच्या उपवासानंतर मुस्लिम समुदाय अल्लाहचे आभार मानण्यासाठी ईदची नमाज अदा करतो. हा सण आनंद आणि समाधानाचा दिवस आहे कारण उपवास करताना येणाऱ्या अडचणी असूनही अल्लाहच्या मदतीची आणि शक्तीची जाणीव करून देतो. ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी घरी येणाऱ्या व्यक्तींना पाहुणचार म्हणून ईदचा खास मेनू शिरखुर्मा दिला जातो. गोडधोड पदार्थाबरोबरच बिर्याणी, पूलावाचा आस्वाद देखील मुस्लिम बांधवांकडून दिला जातो. Eid celebrations | हेही वाचा: वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी