Praniti Shinde | खासदार प्रणिती शिंदेंनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. भाजप आणि महायुतीचे नेते दररोज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतात, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला. अमेरिका, रशिया किंवा आपला देश, सगळीकडे हिटलरशाही चालू आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत. संविधानाने दिलेले अधिकार हिसाकावून घेतले जात आहेत, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. प्रणिती शिंदे काय म्हणाल्या? “बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आणि लोकशाही निर्माण केली आहे. संविधान आपण वाचवलं पाहिजे. जेव्हा सत्ताधाऱ्यांचे विचार हे बाबासाहेबांच्या विरोधात आहेत, जेव्हा देशाचे गृहमंत्री म्हणतात की संविधान संविधान संविधान हे अभी फॅशन बन गया है, जर संविधान आणि बाबासाहेबांचा असा तिरस्कार केला जात असेल, तर ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की, लोकशाहीची चळवळ जिवंत ठेवली पाहिजे,” असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका केली. …पण भाजपच पितळ उघडं पडलं “भाजपने जेव्हा ४०० पारचा नारा दिला होता, तेव्हा कोणाला माहिती होतं की, संविधान बदलण्यासाठी त्यांनी हा नारा दिला होता, पण त्यांचे पितळ उघडं पडलं. बाबासाहेबांना मानणारे जोपर्यंत आहेत, तो पर्यंत संविधानाला आम्ही हात काय बोट पण लावू देणार नाही. बाबासाहेब हे केवळ आपल्या देशासाठी नाही तर संपूर्ण जगासाठी होते ही बाब विसरता येणार नाही, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या. Praniti Shinde | प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, “अमेरिका, रशिया किंवा आपला देश, सगळीकडे हिटलरशाही चालू आहे. त्या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार महत्त्वाचे आहेत. संविधानाने दिलेले अधिकार हिसाकावून घेतले जात आहेत. जेव्हा तीन-तीन वर्ष महानगरपालिकेच्या निवडणूक होत नाहीत त्यातूनच संविधानाचा अपमान होतो. केंद्र सरकार असो की, राज्य सरकार ते संविधानाला मानत नाही. संविधानाने दिलेले अधिकार हिसकावून घेतले जात आहेत. आपला देश हळूहळू हिटलरशाहीकडे वळवला जात आहे,” असाही आरोप प्रणिती शिंदेंनी केला. Praniti Shinde | “देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देऊ म्हटलं होतं. आता ते म्हणत आहेत सगळी वचनं दिली ती पूर्ण केली जात नाहीत. ही फसवणूक आहे. बीडमध्ये सरपंचाचा मृत्यू झाला. या संदर्भातला व्हिडीओ समोर आला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हे सगळं माहिती होतं तरीही ते हसत खेळत होते. या सरकारला आतला आवाजच उरला नाही. सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलीस कोठडीत झाली आहे. तरीही सरकारने काही केलं नाही. रुग्णालयात पैसे भरले नाहीत म्हणून महिलेचा जीव गेला. अशी प्रतिक्रिया त्यांनी तनिषा भिसे प्रकरणावर दिली. Praniti Shinde | हेही वाचा : श्रीरामपुरात काँग्रेसला मोठा धक्का? माजी नगरसेवकांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला, भाजपात करणार प्रवेश