Congress News : काँग्रेसला मोठा धक्का ! 9 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
गडचिरोलीच्या राजकारणात काँग्रेसला (Congress News) मोठा धक्का बसला असून, धानोरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षसह तब्बल 9 नगरसेवकांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Congress News : गडचिरोलीच्या राजकारणात काँग्रेसला (Congress News) मोठा धक्का बसला असून, धानोरा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षसह तब्बल 9 नगरसेवकांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेसचे (Congress News) ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने ही मोठी राजकीय खेळी केली आहे. नागपुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
धानोरा नगरपंचायतीमध्ये काँग्रेसचे 13 नगरसेवक असून उपनगराध्यक्ष ललित बरछा यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा पौर्णिमा सयाम यांच्यासह नगरसेवक भूषण उंदीरवाडे, माणिक मडावी, कालिदास मोहुर्ले, नरेश चिमूरकर ,सुषमा भुरसे, सीमा काटेंगे, यामिना पेंदाम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता काँग्रेसकडे फक्त चार नगरसेवक उरले आहेत.
या प्रवेशामुळे धानोरा नगरपंचायतीतील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची राजकीय ताकद वाढल्याचे मानले जात आहे. काँग्रेससाठी (Congress News) हा मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 17 पैकी 13 जागा जिंकत आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केले होते.
या नगरपंचायत निवडणुकीत वडेट्टीवार यांनी एकहाती सत्ता आणली होती. आज त्याच नगरपंचायतीच्या 9 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे धानोरा नगरपंचायतीवर आता भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे.






