पुणेकरांची चिंता वाढली; गुइलेन बॅरी सिंड्रोममुळे उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

Guillain Barre Syndrome | गुइलेन बॅरी सिंड्रोम या दुर्मिळ आजाराने पुणेकरांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांत या आजाराच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहेत. गुलियन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. संबंधित तरूण मुळचा सोलापूरचा होता.
पुण्यातील डीएसके विश्वमध्ये राहणाऱ्या तरुणाला काही दिवसांपूर्वी गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लागण झाली होती. संबंधित तरूण पुण्यात सीएचं काम करत होता. मात्र तब्येत खालावल्याने त्याला सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गुलियन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. Guillain Barre Syndrome |
हा तरूण बरा होऊन काहीच दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून बाहेर आला होता. परंतु परत श्वासनाचा त्रास झाल्याने आणि प्रकृती आणखी खालावली. त्यानंतर काही वेळातच त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. Guillain Barre Syndrome |
राज्य आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, एकूण 73 रुग्णांपैकी 44 रुग्ण ग्रामीण पुण्यातून, 11 रुग्ण पुणे महापालिका क्षेत्रातून, तर 15 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातून आहेत. तसेच सर्वाधिक 14 रुग्ण हे किरकीटवाडी, DSK विश्व येथे 8 , नांदेड सिटी येथे 7, आणि खडकवासला येथे 6 रुग्ण आढळले आहेत.
गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराची लक्षणे कोणती?
गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे पहिले लक्षण अशक्तपणा आणि हातापायाला मुंग्या येणे हे आहे. ही लक्षणे काही दिवसाने वाढू लागतात. आतापर्यंत पुण्यामध्ये या आजाराची लागण झालेले जे रुग्ण सापडले आहेत, त्यांच्यामध्ये प्रामुख्याने हिच लक्षणं दिसून आली आहेत. हातापायाची ताकद कमी होणे, हातापायाला मुंग्या येणे याशिवाय गिळण्यास आणि बोलण्यास त्रास होणे, धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे ही देखील या आजाराची लक्षणे आहेत. सर्वांत गंभीर प्रकरणांमध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे संपूर्ण पक्षाघात होऊ शकतो.





