चिनी सैन्य काही मिनिटांमध्येच उद्ध्वस्त करेल अटल बोगदा; चीनचा दावा

बीजिंग – तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिमाचल प्रदेशातील मनाली ते लेहला जोडणाऱ्याअटल बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले. सध्या लडाखच्या पूर्वेकडे भारत-चीन तणाव असताना, हा बोगदा प्रकल्प फार महत्त्वाचा ठरणार आहे. या बोगद्यामुळे चीनबरोबर लढण्याची क्षमतादेखील वाढवू शकणार आहे. मात्र, चीनच्या हे काही पचनी पडलेले दिसत नाही. चिनी सरकारचे वृत्तपत्र असणाऱ्या ग्लोबल टाइम्समधील आज एका लेखामधून अटल बोगद्याचा भारताला फारसा फायदा होणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
लष्करी क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञ असणाऱ्या साँग झाँगपिंग यांनी लिहिलेल्या लेखामध्ये म्हंटले कि, युद्धाच्या काळामध्ये या बोगद्याचा भारताला फारसा उपयोग होणार नाही, कारण काही मिनिटांमध्ये चिनी सैन्य हा बोगदा उद्ध्वस्त करु शकते.
युद्धाच्या वेळी खासकरुन लष्करी लढाईमध्ये या बोगद्याचा विशेष काही फायदा नाही. बोगदा नष्ट करण्याच्या अनेक पद्धती चीनच्या पीपल्स रिपब्लिक आर्मीकडे असल्याचा दावा लेखात केला आहे. त्यामुळेच भारत आणि चीनने एकमेकांसोबत शांततापूर्ण संबंध कायम ठेवणेच दोन्ही देशांच्या दृष्टीने फायद्याचे ठरेल, असा सल्लाही या लेखातून देण्यात आला आहे.
अटल बोगदा तयार झाल्याने संपूर्ण भारतात आनंद व्यक्त केला जात असला तरी राजकीय नेत्यांकडून या बोगद्याचा वापर केवळ दिखाव्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी केला जात आहे. हा बोगदा म्हणजे राजकीय प्रचाराचे माध्यम झाला आहे. हा बोगदा भारताला युद्धाच्या काळात फारसा उपयोगी ठरणार नाही. पण हा विचार भारतीय राजकरण्यांच्या डोक्यात नसेलच कारण ते हा बोगदा राजकीय प्रचारासाठी वापरत असल्याचा टोलाही या लेखामधून लगावण्यात आला आहे.
भारत आणि चीनच्या युद्ध क्षमतेमध्ये नक्कीच फरक आहे. चीनच्या तुलनेत भारताची युद्ध क्षमता कमकुवत आहे. युद्ध क्षमतेमध्ये भारत हा चीनपासून खूपच दूर आहे. भारताने युद्धासंदर्भात संयम बाळगावा आणि चीनला उकसवण्याचा प्रयत्न करु नये, असा सल्लाही लेखामधून देण्यात आला आहे.





