‘आधी हत्येची क्रूरता माहीत नव्हती’; नामदेवशास्त्री महाराजांचं मोठं विधान

बीड : धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर नामदेव शास्त्री यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मला आधी संतोष देशमुखांच्या हत्येची क्रुरता माहित नव्हती. त्यामुळे पहिल्या दिवशी जे बोललो ते अजाणतेपणातून बोललो होतो, असे ते म्हणाले. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख परिवार गडावर आले, तेव्हा त्यांनी जाण करून दिली. तेव्हा या क्रूरतेची जाणीव झाली. तेव्हा माझेही अंतःकरण दुखावले.
आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी अशी माझी मागणी असल्याचे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी म्हटले. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेचा विचार व्हायरला हवा, ज्या लोकांनी हत्या केली त्यांची मानसिकता का बिघडली? याचे कारण शोधायला हवे, असे विधान नामदेव शास्त्री यांनी केले होते. त्यानंतर आता नामदेव शास्त्री यांनी आपल्या त्या विधानावरून यू टर्न घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.





