Narhari Zirwal : नरहरी झिरवळांचा ‘तो’ व्हिडीओ धनंजय मुंडेंनी केला व्हायरल? राजकीय वर्तुळात खळबळ, वाचा सविस्तर..
Narhari Zirwal : नरहरी झिरवळ व्हिडिओ प्रकरणात करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Narhari Zirwal : मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांचा काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेला वादग्रस्त व्हिडिओ अद्याप चर्चेत असतानाच या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे. या व्हिडिओबाबत करुणा मुंडे यांनी खळबळजनक दावा करत थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेतले आहे.
नरहरी झिरवळ यांनी यापूर्वीच हा व्हिडिओ बनावट असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, करुणा मुंडे यांनी दावा केला आहे की, हा व्हिडिओ धनंजय मुंडे यांनीच व्हायरल केला. मंत्रिपद मिळवण्याची घाई असल्यामुळे त्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. Narhari Zirwal
“हा माझा ठाम दावा आहे. पण त्यांचे स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही,” असे म्हणत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. तसेच, धनंजय मुंडे यांच्यावर एसआयटी चौकशी, नार्को टेस्ट आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचेही सांगितले. Narhari Zirwal
Narhari Zirwal : नरहरी झिरवळांचा ‘तो’ व्हिडीओ धनंजय मुंडेंनी केला व्हायरल? राजकीय वर्तुळात खळबळ, वाचा सविस्तर..
यावेळी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर आणखी काही गंभीर वैयक्तिक आरोपही केले. त्यांनी आर्थिक व्यवहार, कुटुंबीयांची संपत्ती आणि इतर बाबींची चौकशी करण्याची मागणी केली. 2019 नंतर अचानक वाढलेल्या संपत्तीबाबतही प्रश्न उपस्थित करत संबंधित सर्व व्यक्तींची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. Narhari Zirwal
दरम्यान, या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





