Gopinath Munde : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या कन्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतेच पाटोदा तालुक्यातील भायाळा गावात गणेशानंद गडाच्या नारळी सप्ताहाला भेट दिली. यावेळी उपस्थित भाविक आणि नागरिकांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी भावूक विधान केले होते. ते म्हणाल्या होत्या, “गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचे नाव जगाला विसरू देणार नाही, मी अशी शपथ चितेवर घेतली आहे. गोपीनाथ मुंडे या नावाच्या संस्कारावर किती विश्वास आहे. माझ्या कातड्याचे जोडे केले आणि तुमच्या पायात घातले तरी ही फेड होणार नाही.” पंकजा मुंडेंना करुणा मुंडेंचा खळबळजनक हल्लाबोल पंकजा मुंडे यांच्या या विधानावर आता गोपीनाथ मुंडे यांच्या सून करुणा मुंडे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. करुणा मुंडे यांनी पंकजा मुंडेंना थेट सवाल केला आहे. करुणा मुंडे म्हणाल्या,“पंकजाताई, तुम्ही कधीपर्यंत गोपीनाथ मुंडेंच्या नावावर भावूक विधान करून राजकारण करणार आहात? तुम्हाला जर मुंडे साहेबांना न्याय द्यायचा असेल, तर तुम्ही मागणी करा की मुंडे साहेबांचा एक्सीडेंट होता की मर्डर होता? घातपात होता की अपघात? या गोष्टीसाठी तुम्ही कधी CBI किंवा SIT चौकशीची मागणी केली का?” Karuna Munde करुणा मुंडे यांचा खळबळजनक दावा “मी मुंडे घराण्याची सून आहे आणि मला सर्व गोष्टी माहित आहेत. धन्या मुंडेला तुम्ही त्यांच्या चितेजवळ येऊ दिले नव्हते. मुंडे साहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आणणारा धनंजय होता. तुम्ही शपथ घेतली होती की मी धनंजय मुंडेंसोबत कधी मांडवली करणार नाही. पण राजकारणात तुम्ही एवढ्या लाचार झालात की तुमचे शब्द विसरून गेलात.” गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत मोठा दावा करुणा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत गंभीर दावा केला. त्या म्हणाल्या, “मला सर्व गोष्टी माहित आहेत. गोपीनाथ मुंडे साहेबांचा घातपात झाला होता. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना चौकशीसाठी निवेदन देणार आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “मी धनंजय मुंडे यांची बायको होते. आमच्या बेडरूममध्ये धनंजय मुंडे यांनी राजकारण केलेले आहे. मला सर्व गोष्टी माहित आहेत. “ज्यांनी वाईट केले, त्यांची विकेट गेली” करुणा मुंडे यांनी आणखी एक धक्कादायक विधान केले. त्या म्हणाल्या, “ज्या-ज्या व्यक्तीने माझ्यासोबत वाईट केले, त्यांचे धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद गेले. आमदारकीही जाणार आहे. वाल्मीक कराड जेलमध्ये आहे, तहसीलदार ट्रॅप झाला आणि आता रुपाली चाकणकर यांचीही विकेट गेली आहे.” करुणा मुंडे यांच्या या आक्रमक आणि खळबळजनक विधानांमुळे मुंडे कुटुंबातील (Gopinath Munde) अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे.