दापोलीतील हर्णे बंदरात बोट बुडाली
Updated On:

रत्नागिरी – दापोलीतील हर्णे बंदरात बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही बोट चांगा भोऊनकर यांच्या मालकीची आहे.
बोट बुडाल्याच्या घटनेची माहिती दापोली पोलिस आणि तहसीलदार यांना देण्यात आली आहे. पोलिसांनी पाहणी केली असून दुर्घटनेत कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र बोट कोणत्या कारणामुळे बुडाली याची माहिती स्पष्ट झाली नाही.





