#BiharWACT2024 : उपांत्य फेरीच चित्र झालं स्पष्ट…! जाणून घ्या, भारतासह कोणत्या संघानी मिळवलं स्थान…

Bihar Women’s Asian Champions Trophy 2024 (Rajgir) :- उपांत्य फेरीत आधीच स्थान निश्चित केलेल्या भारतीय महिला संघानं रविवारी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये जपानचा 3-0 असा पराभव केला. हा भारताचा शेवटचा साखळी फेरीचा सामना होता. दरम्यान, भारतानं याआधीच म्हणजे शनिवारी झालेल्या सामन्यात चीनला 3-0 असे पराभूत करताना महिला आशियाई करंडक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं होते.
सामन्यात भारताने पूर्वार्धात एकही गोल केला नाही आणि नंतर उत्तरार्धात तीन गोल केले. स्पर्धेतील टॉप स्कोअरर दीपिकाने दोन गोल (47व्या आणि 48व्या मिनिटाला) केले तर उपकर्णधार नवनीत कौरने 37व्या मिनिटाला भारतासाठी गोल केला. दिवसाच्या इतर सामन्यांमध्ये मलेशियाने थायलंडचा 2-0 असा पराभव केला तर चीनने दक्षिण कोरियाचा त्याच फरकाने पराभव केला. त्यानंतर उपांत्य फेरीच चित्र स्पष्ट झाल. स्पर्धेत पाच सामन्यांतून पाच विजयांसह भारतानं सर्वाधिक 15 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे तर ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चीन (12) दुसऱ्या स्थानावर राहिलं आहे. तिसऱ्या क्रमांकावर मलेशिया तर चौथ्या क्रमांकावर जपान आहे.
Semi-Final Bound! 🙌🇮🇳
Team India storms into the semi-finals of the Bihar Women’s Asian Champions Trophy Rajgir 2024! 💥
With stellar performances and unwavering teamwork, our Bharat Ki Sherniyan continues its journey toward glory.
Up next: India vs Japan on Tuesday – a… pic.twitter.com/mVTkJqkBN0
— Hockey India (@TheHockeyIndia) November 17, 2024
उपांत्य फेरीच सामने….
स्पर्धेत सोमवारी हा विश्रांतीचा दिवस असून मंगळवारी उपांत्य फेरीचे दोन आणि 5-6 व्या क्रमांकासाठीचा सामना होईल. त्यानंतर बुधवारी (20 नोव्हेंबर) लगेचच अंतिम फेरीचा सामना होईल. हा सामना सांयकाळी 4.45 पासून खेळवला जाईल. त्याआधी दुपारी 2.15 वाजता तिसऱ्या-चौथ्या क्रमांकासाठीचा सामना खेळवला जाईल.
स्पर्धेतील पहिल्या उपांत्य फेरीत मंगळावारी दुपारी 2.15 वाजता चीनचा सामना मलेशियाशी होईल तर त्यानंतर मंगळवारीच सांयकाळी 4.45 वाजता दुसऱ्या उपांत्य फेरीत भारतासमोर जपानचे आव्हान असेल.
#BiharWACT2024 : भारताचा सलग पाचवा विजय, अखेरच्या साखळी सामन्यात जपानचाही उडवला धुव्वा….
भारत स्पर्धेत अद्याप अंजिक्य…
भारतीय संघाने या स्पर्धेत पाच साखळी सामने खेळले असून त्यापैकी एकाही सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला नाही. रविवारी अखेरच्या सामन्यात भारतानं जपानला पराभूत करताना पाचव्या विजयाची नोंद केली. त्याआधी पहिल्या सामन्यात मलेशियाचा 4-0 , दुसऱ्या सामन्या कोरियाचा 3-2 , तिसऱ्या सामन्यात थायलंडवर 13-0 तर चौथ्या सामन्यात चीनचा 3-0 असा पराभव केला होता.





