पिंपरी | चिरतरुण ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जाधववाडी, (वार्ताहर) – बोर्हाडेवाडी, मोशी येथील चिरतरुण ज्येष्ठ नागरिक संघाचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला वूड्स व्हिले फेज -3 येथील सांस्कृतिक भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या प्रथम महिला अध्यक्षा वृषाली मरळ प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
महासंघाचे सर्व पदाधिकारी, सायकलमित्र प्रकाश पाटील, पर्यावरणप्रेमी व पीसीएमसी स्वच्छतादूत यशवंत कन्हेरे हे उपस्थित होते.
प्रकाश पाटील यांनी त्यांच्या ‘सायकल मित्र’ या उपाधीविषयी माहिती दिली. तर कन्हेरे यांनी स्वच्छता व त्यांच्या पर्यावरण प्रेमाबद्दल माहिती दिली. त्यांची पिंपरी चिंचवड महापालिके तर्फे स्वच्छता दूत म्हणून नियुक्ती केली आहे. अध्यक्षाीय भाषणात वृषाली मरळ यांनी विशेष मार्गदर्शन केले.
चिरतरुण ज्येष्ठ नागरिक संघ हा सामाजिक, धार्मिक, आरोग्य या सर्व स्तरावर काम करते आहे. दररोज सकाळी 6 ते 8 या वेळेत योगासन वर्ग, सायंकाळी 7 ते 8 या वेळेत हरिपाठ पठण, तसेच संघांचे वाचनालय सुरु आहे. चिरतरुण संघातर्फे रामनवमी, आंबेडकर जयंती, गणपती, ईद सारखे विविध धार्मिक व सामाजिक उत्सव साजरे केले जातात.
या कार्यक्रमासाठी मोशी परिसरातील विविध संघांचे अध्यक्ष उपस्थित होते. तर चिरतरुण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तरेश्वर तोडकर, सचिव सुरेंद्र लोमटे, खजिनदार सुभाषसिंह पाटील, हरीश शेट्टी, दीपक होमकर, सुनिल कवडे, सुनिता कवडे, संगीता गंगावार व जयश्री भोसले तसेच सर्व कार्यकारणी व सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.





