पिंपरी | ज्ञानज्योती विद्यालयाची विज्ञान केंद्राला भेट

जाधववाडी, (वार्ताहर) – ज्ञानाई शिक्षण संस्थेचे कै. जगन्नाथ तुकाराम राऊत प्राथमिक विद्यालय व ज्ञानज्योती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची विज्ञान केंद्राला भेट दिली.
शालेय जीवनात प्रत्येक जण पुस्तकांमधून विज्ञानाची ओळख करून घेत असतात. परंतु प्रत्यक्ष वैज्ञानिक प्रयोग कसे असतात त्या मागील विज्ञान काय आहे हे पिंपरी चिंचवड सायन्स पार्क मार्फत विद्यार्थ्यांना दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मुलांना विज्ञानाची गोडी लागावी शहर आणि परिसरात ऑटोमोबाइल कंपन्यामुळे पिंपरी चिंचवड हे ऑटोमोबाइल हब म्हणूनही ओळखले जाते. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना वाहनांनी माहिती देण्यात आली.
सौरमंडळाविषयी थ्रीडी शो तारामंडळ शो आणि थेट प्रात्यक्षिके यासारखे अनेक विज्ञान शो या केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी क्रियाकलाप आधारित कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजन करण्यात येतात.
यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात तर भर पडलीच परंतु शिक्षकांनीही नव्या युगातील वैज्ञानिक बाबींची उजळणी झाली.
विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना कळव्यात हा प्रयोगातील विज्ञान ओळखा या उपक्रमातील मुख्य उद्देश आहे. सायन्स पार्क ही एक अनौपचारिक शैक्षणिक संस्था आहे जी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवते आणि विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि चौकशीच्या भावनेला प्रोत्साहन देते.
मुख्याध्यापिका वर्षा लोखंडे व प्रभारी मुख्याध्यापक अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले व तसेच विज्ञान शिक्षक यशवंत पवार, रूपाली निळकंठ यांनी सर्व विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संकल्पनेचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना सांगितला.
या कार्यक्रमासाठी संतोष पगडे यांचे सहकार्य लाभले व तसेच दहावीचे वर्गशिक्षक धनाजी उमाटे आणि जयश्री चक्कर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले..





