‘महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपी देश सोडून जाण्याच्या तयारीत’; रोहित पवारांचे ट्विट

Rohit Pawar | परळीतील महादेव मुंडे प्रकरणातील अद्यापही फरार आहेत. नुकतेच महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्याकडून कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाबाबत एक ट्विट केले आहे. ज्यात त्यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आदेश सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
रोहित पवार यांची पोस्ट
‘महादेव मुंडे हत्या प्रकरणात मुंडे कुटुंबीयांना ज्या आरोपीवर मुख्य संशय आहे, तो आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती कळत असून पोलीस यंत्रणांनी यासंबंधित खातरजमा करून त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे. आज उद्या पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या नाही तर आरोपी पसार होण्याची शक्यता आहे,’ असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हंटले आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरणात मुंडे कुटुंबियांना ज्या आरोपीवर मुख्य संशय आहे, तो आरोपी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती कळत असून पोलीस यंत्रणांनी यासंबंधित खातरजमा करून त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे.
आज उद्या पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या नाही तर आरोपी पसार…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 3, 2025
पुढे त्यांनी सांगितले की, ‘मुंडे कुटुंबाला मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आश्वासनानुसार SIT मध्ये पोलीस अधिकारी संतोष साबळे यांचा अद्यापही समावेश झालेला नाही, तपासाला गती देण्यासाठी त्यांचा SIT मध्ये त्वरित समावेश करावा, ही विनंती,’ अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. Rohit Pawar |
दरम्यान, २९ जुलैला आमदार रोहित पवार यांनी महादेव मुंडे कुटुंब यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी संपूर्ण प्रकरण समजावून घेत राज्य सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. Rohit Pawar |
हेही वाचा :





