Pune Crime: वर्षभरापासून फरार असलेल्या ‘मोक्का’मधील आरोपीला अटक; सहकारनगर पोलिसांची कारवाई

पुणे – मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या १ वर्षांपासून फरार असणार्या आरोपीला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे.
राजकुमार शामलाल परदेशी (वय २६ रा. बालाजीनगर धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मोका मधील पाहिजे असलेला आरोपी बालाजीनगर येथील धनकवडे हॉस्पीटल जेथे मित्राला भेटण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिस अंमलदार अमोल पवार आणि महेश मांडलीक यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. यानुसार सापळा रचुन परदेशी याला अटक करण्यात आली. परदेशीवर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत मारामारी असे एकुण ४ गुन्हे असुन त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो फरार होता.
ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक छगन कापसे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पाटील, उपनिरीक्षक बापु खुटवड, अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, किरण कांबळे आदींच्या पथकाने केली.





