Sanjay Raut on Eknath Shinde । राज्यात सध्या शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध होताना दिसून येत आहे. कारण नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी “काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवायची होती म्हणून उठाव केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती,” असे वक्तव्य केले आणि नव्या वादाला तोंड फुटले. दरम्यान,शिंदेंच्या या टीकेला आता ठाकरे गटाकडून सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. “ते आज ज्या नेत्यांकडून सत्कार स्वीकारत आहेत, त्यांनीच एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाला विरोध केला होता,” असा दावा संजय राऊतांनी केला आहे. एकनाथ शिंदे ज्युनिअर नेते, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी, “महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी एकनाथ शिंदे सहभागी होते. त्या सर्व निर्णयात एकनाथ शिंदे होते. त्यांचं लक्ष फक्त त्यांना कोणतं खातं मिळतंय याकडेच होतं. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. त्यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे ज्युनिअर आहेत, त्यांच्या हाताखाली काम करणार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत विचार होऊ शकला नाही. महाविकास आघाडी तयार करून हे सरकार बनवावं लागेल ही भूमिका एकनाथ शिंदेंची होती”, असा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंना शरद पवारांचा विरोध Sanjay Raut on Eknath Shinde । “भाजपाबरोबर सत्ता स्थापन करण्यावेळी एकनाथ शिंदेंना विधिमंडळाचे नेतेपदही दिलं होतं. पण तेव्हा सरकार स्थापन होऊ शकलं नाही. पण आज ते ज्यांच्याबरोबर बसले आहेत असे अजित पवार, ज्यांनी त्यांचा दिल्लीत सत्कार केला असे शरद पवार यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून चालणार नाहीत, अशी भूमिका महाविकास आघाडीच्या वेळी घेतली होती. ते फारच ज्युनिअर आहे, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही, अशी भूमिका मांडली होती”, असं संजय राऊत म्हणाले. …म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत Sanjay Raut on Eknath Shinde । “एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवायचं नसत तर विधीमंडळाच्या नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होऊच दिली नसते. जर भाजपाबरोबर सरकार स्थापन झालं असतं, ५०-५० चा शब्द भाजपाने पाळला असता तर शिंदेच मुख्यमंत्री झाले असते. उद्धव ठाकरे त्याबाबतीत अत्यंत प्रामाणिक आहेत. त्यांना विधिमंडळाचे नेतेपदी बसवलं हाच त्यांच्यासाठी सिग्नल होता. पण भाजपाने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत. काल ज्यांनी त्यांचा सत्कार केला, त्यांनी महाविकास आघाडीत त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही. नंतर ज्या तडजोडी घडतात त्या पुढल्या गोष्टी असतात”, असेही स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिले आहे. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी हे बंड “खरा वाघ कोण असेल तर त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे. त्यांचाच चेला हा एकनाथ शिंदे आहे. शब्द दिला तर दहावेळा विचार करतो. शिवसेना वाचवण्यासाठी, शिवधनुष्यबाण वाचवण्यासाठी, काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी हे (शिवसेनेत बंड पुकारलं) केलं. बाळासाहेब म्हणायचे की शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. रामदास कदम म्हणाले त्याप्रमाणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर हा पक्ष फुटला नसता”, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हेही वाचा Uday Samant : ‘छावा’ मराठीत प्रदर्शित होणार? मंत्री उदय सामंतांनी घेतली दिग्दर्शकाची भेट म्हणाले…