Uday Samant : ‘छावा’ मराठीत प्रदर्शित होणार? मंत्री उदय सामंतांनी घेतली दिग्दर्शकाची भेट म्हणाले…

छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची वैभवशाली गाथा सांगणारा छावा सिनेमाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता विकी कौशलच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे.
महाराणी येसूबाईंची व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अभिनेता अक्षय खन्नाने उभा केलेला औरंगजेब प्रेक्षकांच्या लक्षात राहणार आहे. इतरही अनेक पात्रांचे भरभरून कौतुक प्रेक्षक करताना दिसत आहे. छावा पाहिल्यानंतर प्रेक्षकांना अश्रू अनावर झाल्याचे पाहिला मिळत आहे. आता छावा सिनेमा मराठी भाषेत रिलीज करण्यात येणार असल्याचे संकेत मंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत.
सिनेमा रिलीज झाल्यानंतरच्या चार ते पाच दिवसांत छावाने १५० कोटींहून अधिक कमाई करत कमाईचा एक नवा विक्रम रचला आहे. नुकतीच मंत्री उदय सामंत यांनी छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांची भेट घेतली. यावेळी मनसे नेते अमेय खोपकर देखील उपस्थित होते. सामंत यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून भेटीचा फोटो शेअर करत छावा मराठीत रिलीज करण्यात यावे, असे म्हटले आहे.
आज "छावा" चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीयुत लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली. " छावा " चित्रपट मराठी भाषेतून डब करून प्रदर्शित करावा ही मराठी भाषा मंत्री म्हणुन विनंती केली. ती त्यांनी मान्य केली.सोबत अमेय खोपकर उपस्थित होते.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde… pic.twitter.com/c5aZSyMAjP
— Uday Samant (@samant_uday) February 18, 2025
सावंतांची पोस्ट
आज “छावा” चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीयुत लक्ष्मण उतेकर यांची भेट झाली. “छावा” चित्रपट मराठी भाषेतून डब करून प्रदर्शित करावा ही मराठी भाषा मंत्री म्हणून विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. सोबत अमेय खोपकर उपस्थित होते. उदय सामंत यांच्या ट्विटनंतर छावा मराठी भाषेत प्रदर्शित झाल्यास या चित्रपटालाही भरभरून प्रतिसाद मिळेल, यात काही शंका नाही. छावाने ओपनिंग डे पासून बॅाक्स अॅाफिसवर यशस्वी घौडदोड कायम ठेवली आहे. लवकरच छावा ५०० कोटींचा टप्पा पार करेल असे सांगितले जात आहे.





