Thamma: ‘थामा’चा ट्रेलर प्रदर्शित : हॉरर, कॉमेडी आणि रोमांसचा भन्नाट संगम

Thamma: आयुष्मान खुराना, रश्मिका मंदाना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची मुख्य भूमिका असलेला ‘थामा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी युनिव्हर्स मधील ही नवी एंट्री प्रेक्षकांना भन्नाट अनुभव देण्याचं वचन देत आहे. या ट्रेलरमध्ये अनेक खास गोष्टी दिसून येतात.
१. कॉमेडीचा जबरदस्त तडका
ट्रेलरच्या सुरुवातीलाच हलक्या-फुलक्या कॉमिक डायलॉग्सनी प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न केला आहे. मागील ‘मुंज्या’ चित्रपटात जाणवलेली ही उणीव यावेळी भरून काढली गेली आहे. भीती आणि हशा यामध्ये संतुलन साधणं ही ट्रेलरची मोठी खासियत ठरते.
२. आयुष्मान-रश्मिका जोडीची केमिस्ट्री
आयुष्मान आणि रश्मिकाची केमिस्ट्री ट्रेलरमध्ये उठून दिसते. ही जोडी प्रेक्षकांना ‘स्त्री’ चित्रपटातील राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरची आठवण करून देते. रोमांससोबत हॉरर आणि कॉमेडीचा संगम चित्रपटाला अधिक आकर्षक बनवतो.
३. हॉरर आणि रोमांसचं अनोखं मिश्रण
कथा फक्त भीती आणि विनोदापुरती मर्यादित न ठेवता त्यात रोमँटिक स्पर्श दिला गेला आहे. आयुष्मान आणि रश्मिकामधील रोमँटिक सीन्स प्रेक्षकांना वेगळं आकर्षण देतात आणि इतर चित्रपटांपासून हा चित्रपट वेगळा भासतो.
४. उत्कृष्ट व्हिज्युअल्स आणि वीएफएक्स
या वेळेस ट्रेलरमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स खूपच नेटक्या पद्धतीने सादर केले आहेत. ‘भेड़िया’च्या तुलनेत हे व्हिज्युअल्स अधिक प्रभावी आणि अपडेटेड वाटतात. भीतीदायक दृश्यांना अधिक रोमांचक करण्यासाठी उत्तम तांत्रिक काम वापरलं गेलं आहे.
५. नवाजुद्दीन सिद्दीकीची एंट्री
ट्रेलरमधील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. त्यांनी खलनायकाची भूमिका केली असली तरी त्यात कॉमेडीचा रंग मिसळलेला आहे. त्यांची डायलॉग डिलिव्हरी आणि कॉमिक टायमिंग प्रेक्षकांना चकित करतं. त्यांच्या भूमिकेमुळे हॉरर-कॉमेडी युनिव्हर्स अधिक प्रभावी आणि दमदार होणार असल्याचं दिसतं.





