Kubera Movie : धनुष-नागार्जुन-रश्मिका कुबेरमध्ये एकत्र दिसणार; चित्रपटाचे पोस्टर अन् रिलीज डेटची घोषणा

साऊथचा अभिनेता धनुष त्याच्या आगामी कुबेर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्ट रिलीज केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाची धनुषचे चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. २० जून २०२५ या दिवशी कुबेर हा धनुषचा बहुप्रतिक्षित चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट अनेक भाष्यांसह रिलीज करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. कुबेर धारावीमध्ये स्थित झाला आहे, पण स्थित होण्यासाठी गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्याच्या प्रवासाची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर कमुला यांनी केले आहे. या चित्रपटात घनुषशिवाय टॉलिवूडचा बादशाह नागार्जुनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत प्रदर्शित झालेले पोस्टर्स आणि पहिली झलक यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता निर्माण झाली आहे. धनुषचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. धनुष आणि नागार्जुनच्या चाहत्यांना प्रतीक्षा करण्यासाठी आता काही महिनेच उरले आहेत.
A story of power..👑
A battle for wealth..💰
A game of fate..♟️#SekharKammulasKuberaa is ready to deliver an enchanting theatrical experience from 𝟐𝟎𝐭𝐡 𝐉𝐮𝐧𝐞, 𝟐𝟎𝟐𝟓. pic.twitter.com/EuH5cEppYr— Kuberaa Movie (@KuberaaTheMovie) February 27, 2025
कुबेर चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर माहिती देताना चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे, ज्यामध्ये धनुष आणि नागार्जुन एकमेकांकडे टक लावून पाहत आहेत. या पोस्टरसोबत, “सत्तेची कहाणी, संपत्तीची लढाई, नशिबाचा खेळ. शेखर कमुला कुबेर 20 जून 2025 पासून एक रोमांचक अनुभव देण्यासाठी सज्ज आहे” असे पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.
या चित्रपटात धनुष आणि नागार्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. श्री वेंकटेश्वरा सिनेमा LLP आणि Amigos Creations Pvt Ltd च्या बॅनरखाली कुबेराची निर्मिती सुनील नारंग आणि पुष्कर राम मोहन राव करत आहेत. देवी श्री प्रसाद या चित्रपटाचे संगीतकार आहेत.




