Rashmika Mandana : कपाळावर ठसठशीत कुंकू, गळ्यात दागिने अन्….; ‘छावा’मधील रश्मिकाचा लूक व्हायरल

मॅडॉक फिल्म्सने नुकताच छावा या चित्रपटातील अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा लूक रिलीज केला आहे. या चित्रपटात रश्मिका महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या लूकसोबतच मेकर्सनी छावाच्या ट्रेलर रिलीजची माहितीही शेअर केली आहे. छावा या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही दिवस आधी संभाजी महाराजांच्या भूमिकेतील विक्की कौशलचे अनेक नवीन पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत. तसेच महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतील रश्मिका मंदान्नाच्या लूकचे देखील फोटो रिलीज करण्यात आले आहेत. यासोबतच छावा चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याची देखील माहिती देण्यात आली आहे.
या चित्रपटातील रश्मिका मंदान्नाचा लूक इंस्टाग्रामवर शेअर केला करण्यात आला असून ‘प्रत्येक महान राजाच्या मागे, अतुलनीय ताकदीची राणी उभी असते. स्वराज्याचा अभिमान – महाराणी येसूबाईच्या रुपात रश्मिका मंदान्ना यांची ओळख.’ असे कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे.
मॅडॉक फिल्म्सने छावा या चित्रपटातील महाराणी यशुबाईंच्या व्यक्तिरेखेतील रश्मिकाचे दोन पोस्टर रिलीज केले आहेत. रश्मिकाच्या कपाळावर लाल रंगाच ठसठशीत कुंकू उठून दिसत आहे. तिने नऊवारी साडी परिधान केलेली आहे. नाकामध्ये नथ घातली आहे. तसेच गळ्यातील वजनदार दागिने लक्ष वेधून घेत आहेत.
छावा चित्रपटाचा ट्रेलर उद्या प्रदर्शित होणार असल्याची माहितीही चित्रपट निर्मात्यांनी शेअर केली आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विकी कौशल या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. मॅडॉक फिल्म्सने छावाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आहेत.
छावासोबतच महावतारच्या लूकचीही चर्चा
छावा व्यतिरिक्त विकी कौशल दिग्दर्शक अमर कौशिकच्या महावतार या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात विकी चिरंजीवी भगवान परशुरामच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये विकीच्या लूकचे खूप कौतुक करण्यात येत आहे. महावतार हा चित्रपट योद्धा चिरंजीवी परशुराम यांच्या कथेवर आधारित असणार आहे. हा चित्रपट 2026 मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.





