पुष्पा आणि श्रीवल्लीच्या डान्स स्टेपने पुन्हा एकदा वेधलं साऱ्यांचे लक्ष

Rashmika-Allu Arjun | दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित ‘पुष्पा 2’ चित्रपट सध्या चर्चेत आहे. या सिनेमाचा पहिला भाग ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यानंतर सीक्वलबाबतही चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे.
सध्या रश्मिका आणि अल्लू अर्जुन ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त पाहायला मिळत आहे. मुंबईत आयोजित केलेल्या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या डान्स मूव्हने सर्वांची मने जिंकली आहे.
सध्या सोशल मीडियावर रश्मिका आणि अल्लू अर्जुनचा प्रमोशन दरम्यानच्या डान्सचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुष्पा आणि श्रीवल्ली ‘अंगारों’ या गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहे. हा डान्स त्यांनी मुंबईत आयोजित केलेल्या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटमध्ये केला आहे. त्यांच्या या डान्सने चाहत्यांची मने जिंकली. Rashmika-Allu Arjun |
View this post on Instagram
‘पुष्पा 2’च्या प्री-रिलीज इव्हेंटसाठी रश्मिका मंदानाने खास लूक केला होता. तिचा लूक पाहून चाहते घायाळ झाले. रश्मिकाने काळ्या रंगाची खूपच स्टायलिश साडी नेसली होती. ‘पुष्पा 2’ हा चित्रपट ५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल पुष्पा राज, श्रीवल्ली आणि भंवर सिंग शेखावत यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. Rashmika-Allu Arjun |
‘पुष्पा’चा मुख्य अभिनेता अल्लू अर्जुनला पहिल्या भागातल्या अभिनयासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकवेळा पुढे ढकलण्यात आली आहे, अखेर आता हा चित्रपट काही दिवसांतच प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
साई पल्लवीचा सुपरहिट चित्रपट OTTवर होणार रिलीज; कधी आणि कुठे पाहता येणार?





