Uddhav Thackeray : धुळ्यात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार; माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश

धुळे : विधानसभा निवडणुकीनंतर शिवेसना ठाकरे गटाला गळती लागली आहे. गेल्या काही दिवसात माजी आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडून जाताना दिसत आहेत. अशातच आता धुळ्यात देखील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. Uddhav Thackeray |
माजी आमदार शरद पाटील हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत घड्याळ हातात बांधणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज मुंबईत प्रवेश होणार आहे.
यापूर्वी शरद पाटील यांनी शिवसेनेमधून आमदारकी मिळवली होती. त्यानंतर गेल्या काही काळात पक्षातील कुरघुडींना नाराज होत काँग्रेसमध्ये देखील प्रवेश केला होता. परंतु काही दिवसातच पुन्हा शिवसेनेत ते परतले होते. आता पुन्हा एकदा माजी आमदार शरद पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. आज दुपारी दोन वाजता अधिकृतपणे मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार आहे.
शरद पाटील यांची राजकीय कारकीर्द?
दरम्यान, शरद पाटील हे 2004 ला शिवसेनेचे आमदार होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, पुन्हा ते ठाकरे गटात परतले. असं असलं तरी त्यांना डिसेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाकडून तिकीट मिळाले नाही. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून नाराज होते. अखेर त्यांनी शिवसेना ठाकरे गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे धुळ्यात ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.





