“टीईटी” लांबणीवर!
Updated On:

पुणे – शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. 10 ऑक्टोबर रोजी “युपीएससी’ची परीक्षा असल्याने या दिवशी “टीईटी’ घेता येणार नाही. त्यामुळे ही परीक्षा आठवडाभर लांबणीवर पडणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने “टीईटी’च्या ऑनलाइन अर्जासाठी 3 ऑगस्टपासून सुरुवात झाली. 25 ऑगस्टपर्यंत ही सुविधा उपलब्ध आहे. आतापर्यंत 96 हजार 846 उमेदवारांनी नोंदणी केली. यात पेपर क्रमांक 1 साठी 33 हजार 994, पेपर क्रमांक 2 साठी 20 हजार 302, पेपर क्रमांक 1 व 2 या दोन्ही पेपरची परीक्षा देण्यासाठी 42 हजार 550 याप्रमाणे उमेदवारांची नोंदणी केली. दरम्यान. तत्कालीन करोना प्रादुर्भाव पाहूनच परीक्षा कधी घ्यायची, याचे नियोजन करण्यात येणार आहे. परीक्षेची तारीख नंतर घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली.





